शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे – सुनिल तटकरे

मुंबई – माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघातून त्या तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. अतिशय करारी बाणा, उत्तम अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि चळवळीचे बाळकडू मिळालेल्या त्या एक परिपूर्ण नेत्या होत्या असेही सुनिल तटकरे यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याचे बळ पाटील कुटुंबियांना मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही सुनिल तटकरे यांनी केली आहे.

error: Content is protected !!