दादा चव्हाण आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार बाळासाहेब भाटकर यांना प्रदान

नाट्यकर्मी श्याम नाडकर्णी, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल च्या वतीने देण्यात येणारा कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण आदर्श व्यक्तीमत्व बाळासाहेब भाटकर यांना प्रदान करण्यात आला. कणकवली-शिवजयंती उत्सव मंडळ,हळवल च्या वतीने गेली ३५ वर्षे शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. तसेच गेली १४ वर्षे कै. दत्तात्रय उर्फ दादा चव्हाण स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला श्री.राजू राणे व सौ.राखी राणे पुरस्कृत आदर्श व्यक्तिमत्त्व पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी कणकवली येथील वर्कशॉप गणपती मंदिर येथे मनोभावे सेवा करणारे बाळासाहेब भाटकर यांना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये व जेष्ठ नाट्यकर्मी शाम नाडकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त सत्यनारायणची महापूजा, हरिपाठ, दशावतारी नाटक असे कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमात दरम्यान आमदार वैभव नाईक,शिवसेना उ.बा. ठा. जिल्हा प्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत,युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. पुरस्कार प्रदान करते वेळी मधुकर सावंत,शिवसेना उपतालुकप्रमुख राजू राणे,मा.सरपंच भास्कर गावडे, सौ.स्मिता परब,Ad.श्री. शंकर राणे,मा.उपसरपंच प्रदीप गावडे,प्रभाकर राणे,ग्रा.प.सदस्य अनंत राणे,युवासेना विभागप्रमुख रोहित राणे,विजय परब,आप्पा ठाकूर, सुभाष राणे,विकास गुरव,सुधाकर राणे,अक्षय सावंत,योगेश राणे,गणेश राणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार उमेश परब यांनी केले.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!