आचरा देवूळवाडी येथील स्मशानभूमीची श्रमदानातून साफसफाई

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा देवूळवाडी गणपती मंदिरालगतच्या स्मशानभूमीची सोमवारी देवूळवाडी, मेस्त्री वाडी,पुजारे वाडी,परडेकर मंडळ,डोंगरेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून साफसफाई केली,यावेळी या भागातील सुमारे चाळीस ते पन्नास च्याआसपास ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आचरा देवूळवाडी गणपती मंदिरालगतच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुर्णतः झुडपे आल्याने रस्त्याने जाताना अडथळा येत होता. तसेच मुख्य स्मशानभूमी जागेत अवास्तव वाढलेल्या रानटी झुडपांमुळे हा भाग अडचणींचा बनला होता. याबाबत आचरा देवूळवाडी येथील ग्रामस्थांनी गांगेश्वर मंदिरात बैठक घेऊन सोमवारी २५मार्चला श्रमदानातून स्वच्छता करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार या स्मशानभूमीचा वापर केला जाणाऱ्या डोंगरेवाडी, मेस्त्री वाडी,परडेकर मंडळ,पुजारे वाडी या भागातील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत याभागातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला होता.यात आचरा देवूळवाडी येथीलहरीश्चंद्र पेंडूरकर, अनिकेत घाडी, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी,अर्जुन बापर्डेकर, परेश सावंत,सदानंद घाडी, उदय घाडी,लवू घाडी, रोहिदास पेंडूरकर, मंगेश घाडी, भाऊ घाडी, अभिजित सावंत,प्रफुल्ल घाडी,रामचंद्र घाडी,जितेंद्र राणे,चंदू घाडी,अभय घाडी,रमेश पुजारे, नरेश पुजारे,योगेश घाडी,बबन घाडी,बाळा घाडी, गणेश घाडी, सुहास पेंडूरकर यासह घाडी वाडीतील अनेक ग्रामस्थ, डोंगरेवाडी येथील प्रमोद देसाई, तेजम मेस्त्री वाडी येथील संदेश मेस्त्री, प्रसाद मेस्त्री, मुकुंद मेस्त्री, परडेकर मंडळाचे जितेंद्रराणे, बाबू आईर, आदी ग्रामस्थ तसेच संजय,शिर्सेकर,यांच्या सह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सुमारे अडीच तास चाललेल्या या साफसफाई मोहिमेत झाडाझुडपांनी अडवलेला रस्ता पुर्णतः साफ करण्याबरोबरच स्मशानभूमीभागातील रानटी झुडपे तोडून हा भाग स्वच्छ केला गेला.

error: Content is protected !!