भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नांतून मालवण तालुक्यात नवीन ४ जिओ टॉवर मंजूर
डिकवल, त्रिंबक, कुमामे, चिंदर भटवाडी गावात उभे होणार जिओ टॉवर
सिंधुदुर्ग : लोकसभेचे माजी खासदार तथा भाजपा सरचिटणीस निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यात नव्याने चार जिओ टॉवर मंजूर झाले असून डीकवल, त्रिंबक, कुमामे व चिंदर भटवाडी ही गावे या यामुळे जिओ नेटवर्कशी जोडली जाणार आहेत. कुडाळ व मालवण तालुक्याच्या डोंगरी भागातील अनेक गाव हे आऊट ऑफ कव्हरेज आहेत. हल्लीच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १०३ BSNL टॉवर मंजूर झाले होते. त्याच बरोबर कुडाळ व मालवण तालुक्यातील ५० पेक्षा जास्त गावात जिओ टॉवर साठी निलेश राणे यांचा पाठपुरावा सुरू होता त्यातीलच ४ गावातील टॉवरसाठी मंजुरी मिळाली असून इतर टॉवरही प्रस्तावित आहेत.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग