छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळमध्ये
नाथ पै हायस्कूल येथे बसचे करण्यात आले स्वागत
कुडाळ : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे केली होती. आ. वैभव नाईक यांच्या खास मागणीनुसार, वस्तू संग्रहालयाची बसफेरी कुडाळ, मालवण आणि कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करण्यात आलीय. आज ही बस कुडाळ शहरातील नाथ पै हायस्कूल येथे दाखल झाली. नाथ पै हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव सातपुते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बसफेरीला सुरुवात करण्यात आली.
कुडाळ शहरातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना म्युझियम ऑन व्हील्स टीमने प्राचीन आणि ऐतिहासिक वस्तूंची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना बसमध्ये संग्रहित असलेल्या वस्तू प्रत्यक्षात दाखविण्यात आल्या. शिवकालीन नाणी, दगडी हत्यारे, बाहुबली प्रतिकृती, कोल्हापुरी साज, लघुचित्र, चाकावरील पक्षाची मूर्ती, चंद्रगुप्त दुसरे यांचे नाणे, नक्षीदार वस्त्र अशा अनेक प्राचीन वस्तूंचा यात समावेश होता. उद्या ही बस २३ फेब्रुवारी रोजी शिवाजी इंग्लिश स्कुल पणदूर तिठा, २४ फेब्रुवारी रोजी विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे जाणार आहे.
याप्रसंगी कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका श्रुती वर्दम, नगरसेविका सई काळप, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेवक संतोष शिरसाट, प्रेमदास राठोड, धोंडी गावडे, सहदेव चव्हाण, हनुमंत गोसावी, नूतन पिंगुळकर, शांती पावसकर, एज्युकेशन फॅसिलीटीचे चिन्मय गावडे, शिवाजी तावडे, शांतीनी सुतार, मयूर भंडारे, ओंकार डोंगरकर, धीरेंद्र चव्हाण, संदीप महाडेश्वर, बाबी गुरव, ओंकार शिरसाट आदी उपस्थित होते.
रोहन नाईक / कोकण नाऊ / कुडाळ