बाव मध्ये २४ रोजी मोफत आरोग्य शिबीर
प्रतिनिधी । कुडाळ : समर्थ महीला शक्ति प्रतिष्ठान व माविम महीला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत .महीला बचत गट हॉल बांव, ग्रामपंचायत नजीक मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तसेच जास्तीत जास्त गरजूनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फ़े करण्यात आले आहे.
या आरोग्य तपासणी शिबिरात दंत चिकित्सा स्पेशालिस्ट डॉ. अपुर्वा ठाकुर पिंगुळकर, नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान मिर्नवास परब आणि आर.बी तेली
डॉ प्रणव प्रभू हे आरोग्य तपासणी करणार आहेत. कोकण विकास शिक्षण संस्था यांच्या कडुन रक्ताच्या सर्व तपासण्या विनामूल्य होणार आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.