दिव्यांग बांधवांच्या उत्तम आरोग्य सेवेसाठी प्रयत्न होणे आवश्यक – डॉ. आर. एस. कुलकर्णी

माड्याचीवाडी येथे दिव्यांगांसाठी मेळावा आणि मार्गदर्शन शिबीर

ग्राम पंचायत, साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, आणि काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था यांचा उपक्रम

निलेश जोशी । कुडाळ : दिव्यांग बांधवांना अधिकाधिक आरोग्य सेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. माडयाचीवाडी ग्रामपंचायतीने दिव्यांगासाठी मेळावा घेऊन एक स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेतला हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ आर एस कुलकर्णी यांनी केले. रविवारी सायंकाळी माङयाचीवाडी येथे दिव्यांगासाठी आयोजित मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
कुडाळ तालुक्यातील माडयाचीवाडी ग्रामपंचायत आयोजित साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग लाभार्थी यांना शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजना  त्यांना मिळाव्यात  पेन्शन इतर जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्याची  माहिती मिळावी म्हणून दिव्यांग लाभार्थी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत माड्याचीवाडी सभागृहात करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन  सरपंच विघ्नेश गावडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलाने झाले. यावेळी जिव्हाळा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष सुरेश उर्फ दादा बिर्जे, साहस प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपाली पाटील, उमेश हडकर, ग्रामपंचायत सदस्य रतन तर्पे, विजय तुळसकर, काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी, उर्मिला चव्हाण, विनायक चव्हाण, ग्रामसेवक मनोहर शेडगे, माजी सरपंच दाजी गोलम, विष्णू खोबरेकर, प्रसाद पोईपकर, मातृत्व आधार  फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे,  दिया लुडबे,  नीलिमा रावले, कुडाळ मालवण युवती अध्यक्ष सोनाली पाटकर, दादा वेंगुर्लेकर, राजन गावडे, विकास मठकर, वैशाली गावडे, महेश गावडे, माडयाचीवाडी पंचक्रोशीतील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ कुलकर्णी म्हणाले, रुग्ण तपासणीसाठी बरेच शासकीय विभाग आहेत योजना काय आहेत याबाबत  दिव्यांग बांधवांना माहिती दिली पाहिजे. मेळावे घेतानाच त्याच्यासाठी आरोग्य शिबीर घेण्यासाठी मी निश्चितच माझा वेळ देइन. वैद्यकिय क्षेत्र आता खूप पुढे गेले आहे. विविध आजारावर आज सर्व सुविधा तज्ञ डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत. आज अनेक दिव्यांग बांधवानी परिस्थितीशी सामना करतानाच क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपले नावलॉकिक मिळविले आहे. अपघात किंवा पडणे आदींमुळे दिवसेंदिवस मृत होण्याची संख्या वाढत चालली आहे. राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2023 अखेर 13800 लोकांचे जीव गेले आहेत. अनेक दिव्यांग झाले आहेत.   पुढील वर्षात दिव्यांग प्रमाण कमी झाले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.
सरपंच विघ्नेश गावडे यांनी असा सामाजिक उपक्रम आमच्या ग्रामपंचायतमध्ये सर्वाच्या सहकार्याने राबविता आला अशा प्रकारचे उपक्रम आम्ही यापुढेही घेऊन दिव्यांग बांधवासोबत राहू असे सांगितले. साहसच्या अध्यक्ष सौ पाटील यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या जिल्हा परिषदेच्या खूप योजना आहेत, मात्र या योजना आपल्याला माहीत नाहीत. न्याय्य मागण्यासाठी आपण संघटीत झाले पाहिजे. यासाठी अशा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगत दिव्यांगासाठी आमची संस्था काम करीत असून दिव्यांग हे आमच्यासाठी परमेश्वर आहेत. त्यांची सेवा करण्याचे काम आमच्या हातून होत आहे हे आमचे भाग्य आहे. दादा बिर्जे यांनी दिव्यांगसाठी आमचा जिव्हाळा सेवाश्रम नेहमीच सहकार्य करील असे सांगितले.
काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी यांनी आम्हा दिव्यांगसाठी काम करणारी  माड्याचीवाडी ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत आहे.
शासकीय योजनापासुन आम्ही वंचित आहोत. आज समाजात आमच्याबाबत खूप अनास्था दिसून येत आहे. हे चित्र बदलले पाहिजे असे सांगितले. तर संतोष लुडबे यांनी आमच्या मातृत्व सस्थेने बऱ्याच मुलांना दत्तक घेतले असून हा सामाजिक वसा गेली तीस वर्षे सुरू असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित दिव्याग बांधवाना ग्रामपंचायतच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. सुत्रसंचालन व आभार विकास मठकर यांनी केले. .

निलेश जोशी,कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!