कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यावेळी केला होता सत्कार!

माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर जोशींच्या आठवणींना अजयकुमार सर्वगोड यांच्याकडून उजाळा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नुकतेच निधन झाले. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असतानाची एक जुनी आठवण कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी उलगडत आठवणींना उजाळा दिला. नेमकी काय होती ही आठवण? याची माहिती दिली आहे अजयकुमार सर्वगोड यांनी. ही आठवण व्यक्त करताना कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोड म्हणतात डॉ. मनोहर जोशी सर गेले ही बातमी ऐकून मला मनस्वी दुःख झाले.. अतिशय हुशार बुद्धिवान दूरदृष्टी असणारा अणि विशेष म्हणजे कठोर शिस्तीचे पालन करणारा नेता हरपला ही वेदनादायि गोष्ट आहे..21 जून 1996 वार शुक्रवार या दिवशी दासगाव तालुका महाड जिल्हा रायगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आले होते…मी त्यावेळी महाड मध्ये शाखा अभियंता होतो 14 वर्षे रखडले प्राथमिक आरोग्य केंद्र चे काम मी अणि माझे उपअभियंता दीक्षित साहेब आम्ही 6 महिने मध्ये पूर्ण करून घेतले होते …हे प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगराच्या कुशीत आहे अतिशय सुरेख आणि देखणी इमारत बांधण्यात आली होती..डॉ मनोहर जोशी सर यांनी इमारत बांधकाम चे कौतुक केले …
यांच्या हस्ते माझा सत्कार सुधा करण्यात आला होता जोशी सर यांनी माझे गोड अणि अमृत वाणीने कोड कौतुक केले होते…..
डॉ जोशी सर यांनी मुख्यमंत्री असताना अनेक कामे केली त्या मध्ये भुकेले अन्न यासाठी एक रुपया मध्ये झुणका भाकर, महिला च्या लज्जा रक्षण साठी घर तिथे शौचालय माय भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरण्या साठी पाणी पुरवठा योजने साठी स्वतंत्र खाते निर्माण केले अणि भरघोस निधी सुधा उपलब्ध करून दिला अणि गाव तिथे पाणी पुरवठा योजना प्रभावी रित्या राबवली त्यांनी केलेल्या कार्याची लाख लाख सलाम महिला वर्ग अणि गोरगरीब जनता त्याची कायम स्वरूपी ऋणी राहील यात काही शंका नाही….या महान सुसंस्कृत शिस्त प्रिय हुशार बुद्धिमान विनोदी भाषणासाठी प्रसिद्ध असणार्या, मधुर वाणीच्या नेत्याला महाराष्ट्र कदापि विसरणार नाही.
कणकवली /प्रतिनिधी





