खांबाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

रक्तदान शिबीर व भव्य मोटारसायकल, रिक्षा रॅलीने केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळेचे आयोजन

वैभववाडी – साडेचारशे वर्षानंतर ही शिवरायांचे स्मरण आपण करीत आहोत आणि वर्षानुवर्षे त्यांचे स्मरण सर्व करीत राहतील. आजही देश आणि परदेशातील लाखो विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणांवर आधारित पीएचडी करत आहेत. सागरी सुरक्षेविषयी ही त्यांनी त्या काळी ठोस पावले उचलली होती. युद्धनीती जगभर चर्चली जात आहे. शेतीविषयक त्यांचे धोरण दिशादर्शक ठरले आहे. आज कोट्यवधी लोक शिवरायांचा अभ्यास करताना पहावयास मिळते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रची आणि देशाची खरी ओळख आहे. असे प्रतिपादन वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले ते रक्तदान शिबीर प्रसंगी बोलत होते
शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे यांचे वतीने केंद्रशाळा येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे हस्ते झाले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, कॅप्टन राजाराम वळंजू, सोसायटी चेअरमन प्रविण गायकवाड, सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम, पोलीसपाटील प्रमोद तावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके, शिवप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव,माजी सरपंच संजय साळुंखे,मंगेश कदम, विठोबा सुतार, सारीका सुतार,माजी चेअरमन दिपक चव्हाण,सुनील पवार, आचीर्णे माजी सरपंच महेश रावराणे, लोरे नं. २ सरपंच विलास नावळे, कोळपे सरपंच सुनील कांबळे,तिरवडे तर्फ खारेपाटण सरपंच जितेंद्र तळेकर, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ, रक्त संक्रमण जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग चे डाॅ. सिम्मिली, डॉ. ओंकार पाटील, समाजसेवक दिपक पवार, तंटामुक्त अध्यक्ष मंगेश कांबळे, ग्रा.पं.सदस्य मंगेश (बंडू) गुरव, ग्रामसेविका नयना गुरखे, जेष्ठ नागरिक शांताराम पवार, मारुती परब, पंढरीनाथ पवार आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात एकूण 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबीर यशस्वी करणेसाठी मेघनेश पवार, हर्षद पवार, रोहित पवार, महेश पवार,मंगेश सुद, अंबाजी पवार,छोटू गुरव, अक्षय पवार,यश गुरव, पंकज चव्हाण, बळीराम सावंत, विलास मोहिते,समीर कर्पे, गोट्या साळुंखे, विक्रांत पवार,अभिषेक माळकर, सुधीर लोके आदि उपस्थित होते. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र व शिवप्रतिमा भेट देण्यात आली. उपस्थितांचे आभार रुपेश कांबळे यांनी मानले
सायंकाळी ४.३० वा भव्य मोटारसायकल, रिक्षा रॅली खांबाळे श्री आदिष्टी देवालय मंदिरांपासून ते लोरे नं. २ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तिथून पुढे वैभववाडी संभाजी महाराज चौक ते पुन्हा खांबाळे केंद्र शाळा नं. १ पर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. या रॅलीत असंख्य युवक सहभागी झाले होते.

error: Content is protected !!