भजनी बाल कलाकारांनी भाविकांना केले मंत्रमुग्ध

हुमरमळा (वालावल ) श्री रामेश्वर मंदीरात वैभव मांजरेकर मित्र मंडळाचे आयोजन

अतुल बंगे यांच्या हस्ते झाले दीपप्रज्वलनाने उद्घाटन

निलेश जोशी । कुडाळ : वैभव मांजरेकर मित्र मंडळ यांच्या वतीने हुमरमळा वालावल येथे श्री रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवांचे औचित्य साधून भजन सुधा हा बाल कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड दाद देत या बालकलाकारांवर बक्षीसांचा अक्षरशः वर्षाव केला.


राम कृष्ण हरी भजन संस्कार वर्ग यातुन संगित गायनाचे धडे घेतलेले हे विद्यार्थी गुरवर्य योगेश प्रभु यांच्याकडे संगिताचे धडे घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम करुन रसिकांची वाहवा मिळवत आहेत. कार्यक्रम यशस्वी करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांनीही दाद दिली. या कार्यक्रमाचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी , श्री देव रामेश्वर उपसमिती देवस्थान अध्यक्ष अमृत देसाई आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेखर परब, आशिश देसाई , मयुर प्रभु, मंदार वालावलकर, शरद वालावलकर, प्रकाश परब, प्रकाश आजगावकर उपस्थित होते. भजनप्रेमी रसिकांनी या बाल कलाकारांच्या भजनांचा मरमुराद आनंद लुटला आणि कलाकारांना प्रोत्साहित देखील केले.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!