कुडाळ-मालवण मध्ये तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत कोट्यवधींचा निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न आणि शिफारस
बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली मंजूरी
निलेश जोशी । कुडाळ : माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून सातत्याने कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा ओघ सुरू आहे. . राज्य शासनाच्या विविध विभागाअंतर्गत गेल्या वर्षभरात कोट्यवधींचा निधी निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ व मालवण तालुक्यातील खर्ची झाला असून आता पुन्हा नव्याने वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे.
यात पहिल्या टप्यात वेरळ धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – ५ लक्ष, गोळवन धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – ५ लक्ष, कुडोपी धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – ५ लक्ष, तुळसुली कर्याद नारूर कदमवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – ५ लक्ष, तुळसुली कर्याद नारूर धनगरवाडी ते लव्याचापाचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे – ५ लक्ष, गोठोस निवजे मुख्य रस्ता ते बायजी खरात यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे- ५ लक्ष, गोठोस धनगरवाडी रस्ता येथे स्ट्रीट लाईट करणे- ३ लक्ष या कामांची प्रशासकीय मान्यता झाली असून एकूण ४० लक्ष एवढा निधी खर्ची होणार आहे तर एकूण १ कोटी ६० लक्ष एवढ्या कामांची प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे.
कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, धनगर समाज जिल्हा प्रमुख नवलराज काळे, तालुका प्रमुख दीपक खरात आदींनी माजी खासदार निलेश राणे व महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.