सिंधुदुर्गातील ठाकर समाजाला न्याय मिळण्यासाठी “त्या”अधिकाऱ्याला तातडीने हटवा

आमदार नितेश राणे यांची आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे मागणी
तातडीने आयुक्तांना सूचना देण्याचे आश्वासन
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील ठाणे येथील कार्यालयात जाणारे जात पडताळणी चे प्रस्ताव तेथील सहआयुक्त असणारे डी जी पावरा हे जिल्ह्यातील ठाकर समाजावर अन्याय करत जाणीवपूर्वक फेटाळून लावत असल्याने जिल्ह्यातील ठाकर समाजावर अन्याय होत आहे. मात्र याच प्रस्तावांबाबत त्यानंतर जर न्यायालयात दाद मागितली तर त्याला मंजुरी दिली जात आहे. त्यामुळे श्री. पावरा हे जाणीवपूर्वक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाला त्रास देत असल्याकडे आमदार नितेश राणे यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लक्ष वेधले. त्यामुळे अशा अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान याबाबत संबंधित आयुक्तांना तातडीने सुचना दिल्या जातील. येत्या दोन दिवसात याबाबतची कार्यवाही होईल असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाने याबाबत आमदार नितेश राणे यांचे नुकतेच लक्ष वेधले होते. यापूर्वी ठाकर समाजातील दाखल्याचा प्रश्न श्री. राणे यांनी मार्गी लावला होता. दरम्यान या पावरा या अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील ठाकर समाजावर अन्याय होत असून या अधिकाऱ्याला या पदावरून बदलण्याची मागणी समाजाकडून केली जात होती. त्यानुसार आमदार श्री. राणे यांनी आज विजयकुमार गावित यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले.
दिगंबर वालावलकर / कणकवली