कोंडये येथील डान्स स्पर्धेत रत्नागिरीचा ऋतिक निकम विजेता

शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम

कणकवली: कणकवली तालुक्यातील कोंडये गावात शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी खुल्या डान्स स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या ऋतिक निकम या नर्तकाने प्रथम क्रमांक
पटकाविला. निलेश मेस्त्री युवक मंडळांनी शिवजयंतीनिमित्त कोंडये वरची वाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी खुल्या डान्स स्पर्धेमध्ये रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 26 स्पर्धकांनी भाग घेतला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते वीज महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते.पत्रकार गणेश जेठे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर रणजीत पवार वनखात्याचे अधिकारी अतुल खोत श्री शेवाळे श्री राज माजी सरपंच अनिल मिस्त्री गावचे पोलीस पाटील संदेश मे, दिगंबर मेस्त्री गणपत तेली सोसायटी संचालक अनंत तेली दिलीप परब यांच्या उपस्थितीत रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे उद्घाटन झाले.स्पर्धेचे परीक्षक सुधीर जोशी ,अश्विनी पेडणेकर आणि मनवा शेटये यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. डान्स स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक कुडाळची दीक्षा नाईक हीने तर तृतीय क्रमांक देवगडचा रमाकांत जाधव याने पटकावला गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जुदो स्पर्धेमध्ये मोठे यश मिळवलेल्या कस्तुरी तीरोडकर व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेल्या दुर्गा मुणगेकर हीचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी रंजना जेठे, मंगेश परब, मनोहर सावंत तुकाराम तेली आदर्श शिक्षक विद्याधर तांबे आनंद परब अनंत आंबेरकर जगन्नाथ आंबेरकर राजन धोपटे समीर शिवगण महेश पेडणेकर सुधाकर तेली नागेश तेली विश्वनाथ शिवगण विजय धोपटे कृष्णा परब विजय परब रुपेश सावंत समाधान वाघरे मंगेश रेडकर प्रथमेश पेडणेकर कमलेश जैतापकर संदीप कारेकर लता तीरोडकर उर्मिला मेस्त्री मीरा शिरसाट हे
उपस्थित होते. गावातील युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली .या कार्यक्रमानिमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. विशेष म्हणजे होम मिनिस्टर स्पर्धा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनन्या मेस्त्री द्वितीय क्रमांक भाग्यश्री जेठे आणि तृतीय क्रमांक प्रमिला मोंडकर हिने पटकावला. या कार्यक्रमासाठी भाऊजी म्हणून उमेश परब यांनी काम पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश मेस्त्री यांनी केले तर सूत्रसंचालन सिद्धेश खटावकर यांनी केले.

कणकवली / कोकण नाऊ / प्रतिनिधी

error: Content is protected !!