कुडाळ पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

नंदकिशोर मोरजकर आणि वैभव केळकर.याना भैयासाहेब वालावलकर स्मृती पुरस्कार
भाग्यविधाता वारंग याना वसंत दळवी स्मृती पुरस्कार
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुका पत्रकार समितीचे सन २०२३-२४ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ‘व्याधकार’ ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार सावंतवाडी येथील दैनिक कोकणसादचे पत्रकार नंदकिशोर मोरजकर, ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय छायाचित्रकार पुरस्कार देवगड येथील वैभव केळकर, वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार दैनिक तरुण भारत चे झाराप प्रतिनिधी भाग्यविधाता वारंग यांना जाहीर झाला आहे. कुडाळ पत्रकार समितीचे अध्यक्ष आनंद मर्गज यांनी नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत या पुरस्कारांची घोषणा केली.
कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे दरवर्षी व्याधकार ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर यांच्या नावाने जिल्हा पत्रकार पुरस्कार व जिल्हा छायाचित्र पुरस्कार दिला जातो. तर (कै) वसंत दळवी स्मृती नावाने ग्रामीण पत्रकार पुरस्कार ग्रामीण भागातील पत्रकाराला देण्यात येतो. पुरस्कार वितरण सोहळा व नियोजनाची बैठक नुकतीच हॉटेल लाइमलाइट येथे तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष आनंद मर्गज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
जिल्हा पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी प्रमोद म्हाडगुत यांना मिळाल्याने, तसेच निलेश जोशी यांना आकाशवाणीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार प्राप्त झाल्याने या दोघांचा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद मर्गज, तालुका पत्रकार समितीचे उपाध्यक्ष वैशाली खानोलकर, सचिव काशीराम गायकवाड़, खजिनदार विठ्ठल राणे, जिल्हा प्रतिनिधी राजन नाईक, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, प्रमोद ठाकूर, अजय सावंत, निलेश जोशी, प्रमोद म्हाडगूत, रजनीकांत कदम, गुरु दळवी, भुषण देसाई, भाग्यविधाता वारंग आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.