4 फेब्रुवारी रोजी कांदळ गावात पुण्यानुमोदन आणि सिद्धार्थ कदम शोकसभा

कांदळगाव ( तालुका मालवण) – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार सन २०१०” या पुरस्काराने सिध्दार्थ विकास मंडळ कांदळगांवने सन्मानित केलेले सामाजिक कार्यकर्ते, ,सेवानिवृत्त सहायक वाहतुक निरीक्षक, राष्ट्आरपीआय आठवले गटाचे सिंधुदुर्ग जिल्हा माजी अध्यक्ष, साथी सिध्दार्थ कृष्णाजी कदम हे दिवंगत झालेने त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम 4 फेब्रुवारी रोजी कांदळगाव येथे आयोजनात आला आहे
कांदळगाव येथीलसम्राट अशोक नगरातील त्यांचे घरी कुटुंबियांचे वतीने पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व त्या निमित्ताने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आदरणीय डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या दी बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय जिल्हा व तालुका पदाधिकारी, सर्व गाव शाखांचे पदाधिकारी, सर्व विधी संचालक (विधीकर्ता), उपासक उपासिका यांनी, तसेच त्यांचे मित्रपरिवार, धम्मबांधव, त्यांचे समवेत काम केलेले पदाधिकारी व बौद्ध अनुयायी यांनी कांदळगावी उपस्थित राहावे अशी विनंती .
आयु. विद्याधर धोंडु कदम जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा दी बुध्दीस्ट सोसायटी यांनी केली आहे.

error: Content is protected !!