सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सीईओ प्रजित नायर यांची बदली

मकरंद देशमुख नवीन सीईओ

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मंत्रालयातील मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव मकरंद देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. गेली काही वर्षे प्रजित नायर हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ते चर्चेत होते. नुकत्याच झालेल्या ग्रामसेवकांच्या निलंबन कारवाई प्रकरणी देखील हे चर्चेत आले होते. श्री देशमुख हे 2020 चे आयएएस अधिकारी असून त्यांना तात्काळ कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!