कणकवली तालुक्यातील ठाकर अनुसूचित जमातीचे जातीचे दाखले अखेर पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या प्रयत्नाने देण्यास सुरुवात.

कणकवली/मयुर ठाकूर.

दि.13/10/2022 कणकवली तालुक्यातील ठाकर समाजाचा विद्यार्थी शंकर संदीप गावकर याला जात पडताळणी समिती ठाणे यांनी छाननी मध्ये अवैद्य ठरविले होते. त्या अनुषंगाने प्रांत अधिकारी कणकवली यांनी दिनांक 3 जानेवारी 2023 ला कणकवली तालुक्यातील ठाकर समाजाला जातीचे दाखले देणे बंद करण्याचे आदेश निर्गमित केलेले होते त्यामुळे कणकवली तालुक्यात सेतू मध्ये ठाकर समाजाचे जातीचे प्रस्ताव घेणे सेतू कार्यालयाने बंद केलेले होते. त्यामुळे समाज आदिवासी ठाकर समाजातील विद्यार्थी यांचे शैक्षणिक आणि विविध योजनांतील लाभार्थी यांचे नुकसान झालेले होते. सदरची गंभीर बाब पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली या संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर सेतू कार्यालयात संपर्क साधून सुहास संतोष ठाकर या विद्यार्थ्याचे जात दाखल्याचे प्रस्ताव जमा करून घेतले आणि त्यानंतर संबंधित यंत्रणेत वेळ घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी जात पडताळणी समिती आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र देत असल्यामुळे तुमच्या दाखले बंद करण्यात आलेले आहेत असे सांगितले. त्यानंतर सदर बाबीचा पाठपुरावा करत पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली यांनी जात पडताळणी कार्यालयाला संपर्क साधून त्यांच्याकडून गेली वर्षभरात मिळालेल्या जात वैधता प्रमाणपत्र बाबत माहिती कार्यालयात सादर केली. आदिवासी जात पडताळणी समिती ठाणे येथे संपर्क साधून पावरा साहेबांचे सहकार्य घेतले त्यानंतर अनुसूचित जात पडताळणी समिती ठाणे चे डायरेक्टर श्री. दिनकर पावरा साहेब यांनी प्रांत अधिकारी कणकवली यांच्याशी संपर्क साधून जात प्रमाणपत्र देण्याबाबत सविस्तर माहिती दिली गेली वर्षभरात आपण जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केल्याचे सांगितले. प्रांत अधिकारी काटकर साहेब यांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर आपली सर्व यंत्रणा कामाला लावून तात्काळ सुहास संतोष ठाकर याचे जात प्रमाणपत्र या कामी सेतू कार्यालय तसेच प्रांताधिकारी कार्यालय यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कामी पाठपुरावा करण्यासाठी गेले चार महिने पंचक्रोशी ठाकर समाजाचे अध्यक्ष अमित ठाकूर ,सचिव समीर ठाकूर ,कार्याध्यक्ष विठ्ठल ठाकूर, उपाध्यक्ष सच्चिदानंद ठाकूर, अविराज मराठे, मदन ठाकूर, सचिन ठाकूर, रामजी ठाकूर ,रामदास ठाकूर, अनिल ठाकूर यांचे सहकार्य लाभले आहे. कणकवली ठाकर समाज बांधवांनी आपले जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव परिपूर्ण सादर करावे जर कोणत्या शंका असतील तर पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा.

error: Content is protected !!