सर्व औषध कर्मचाऱ्यांनी आपण खूपच संवेदनशिल विभागात सेवा करतोय याचे भान ठेवून आपली संघटना मजबूत करावी- नंदू उबाळे

कणकवली/मयुर ठाकूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध कर्मचाऱ्यांनी एकत्र येत एकसंग राहण्याच्या कृतीला आपण दाद देतोय तसेच औषध कर्मचारी म्हणून आपण करत असलेल्या सामाजिक कार्याला शुभेच्छा देत आपण करत असलेल्या विभागात म्हणजेच औषध व्यवसायात नविन नविन गोष्टी आत्मसात कराव्यात अस आव्हान सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन चे माजी अध्यक्ष श्री.नंदू उबाळे यांनी केलं.ते कणकवली येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या स्नेहमेळाव्यात बोलत होते.
दिवसभर झालेल्या मेळाव्यात कणकवली तालुक्याने क्रिकेटच्या सामन्यात सलग पाचव्यांदा कुडाळ संघाला हरवून विजेतपद पटकावले.सदर स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणून कणकवली संघाच्या अमित मनचेकर यांची निवड झाली तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून कुडाळ संघाच्या योगेश सावंत यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला कणकवली तालुक्यातील औषध व्यापारी उपस्थित होते.तसेच सर्वच ज्येष्ठ औषध कर्मचारी,सर्व तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कणकवली तालुक्याने अथक मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष श्री.समीर ठाकूर तर आभार सचिव श्री.अभिजित गुरव यांनी केलं तर सूत्रसंचालन श्री.दीपक मेस्त्री यांनी केलं.

error: Content is protected !!