प्रयत्नात सातत्य असेल तर यशाची शिखरे सर करता येतातपद्मश्री परशुराम गंगावणे यांचे आवाहन

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

विद्यार्थी जीवनात प्रयत्नात सातत्य ठेवा, जीवनात कठीण प्रसंग येत असतात त्यावर मात करायला शिकलं पाहिजे,आपण जसा विचार करतो तसेच आपण पुढे घडतो म्हणून सकारात्मक विचार करा.मोबाईलच्या मोहात पडू नका, आपली संस्कृती व परंपरा जपा, आपल्या जिल्यातील विद्यार्थ्यांना मध्ये गुणवतेची कमी नाही.आज आपल्या जिल्यात वेगवेगळ्या क्षेत्रात विद्यार्थी चमकत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे यासाठी असे आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत असे असल्याचेही प्रतिपादन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले.
शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे व संस्थाचे अध्यक्ष श्री प्रदीप प्रभूतेंडोलकर, संस्था सचिव श्री मुकुंद धुरी,संचालक श्री सतीश साळगावकर, ऍड. विवेक मांडकुलकर श्री रमाकांत धुरी, श्री पद्माकर धुरी, श्री तुकाराम गोडे, झाराप येथील प्रसिध्द उद्योजक व संस्थेचे आश्रयदाते श्री दिलिप प्रभूतेंडोलकर , पोलीस उपनिरीक्षक श्री सागर शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर शारबिद्रे, साळगाव उपसरपंच श्री रुपेश जाधव, माजी विद्यार्थी श्री दत्ताराम सावंत, श्री सुभाष तेंडोलकर, माजी शिक्षिका सौ.सुमन धुरी, श्री दिलीप माळकर , श्री बाळा पालव,श्री हंसराज सावंत, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष श्री वासुदेव मेस्त्री, श्री एकनाथ गवस, सौ.धनश्री डिचोलकर, श्री नारायण मेस्त्री, आदी मान्यवर तसेच विद्यार्थ्यांनचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी संस्था अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रदीप प्रभु तेंडोलकर म्हणाले की आपण शाळेला विसरता कामा नये शाळेमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो तसेच आपण घरातील वडीलधाऱ्या माणसाचा मान राखला पाहिजे शाळा ही समाजाची प्रतिकृती असते त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी शिक्षणप्रेमी दाते संस्था यांनी घालून दिलेला वसा कायम ठेवा असेही आवाहन त्यानी याप्रसंगी केले.
यावेळी चालू शैक्षणिक वर्षात उज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांना पंचक्रोशीतील दाते संस्था, आजी-माजी शिक्षक तसेच अन्य व्यक्तीनी पुरस्कृत केलेल्या बक्षिसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.चालू वर्षीचे आदर्श विद्यार्थी म्हणून कु.अविष्कार खानोलकर, कुमा.भार्गवी गवस, कु.अनंत कोरगावकर ,कुमा.अनुष्का हरमलकर यांची तर क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडू म्हणून कुम.गितेश मेस्त्री व कु.समिक्षा मांजरेकर यांची निवड करण्यात आली. तसेच विभागीय फुटबॉल स्पर्धेत यशस्वी झालेल्या संघाला विशेष पुरस्कार देण्यात आले.यावेळी रोटरी क्लब आयोजीत चित्रकला स्पर्धात यशस्वी झालेल्या कु.अथर्व हळदणकर यालाही सन्मानित करण्यात आले.तसेच तालुकास्तरिय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी प्रतिकृती व शिक्षक प्रतिकृती बनविण्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या कु.रमेश गोडे, व कु.गुरुप्रसाद परब व विज्ञान शिक्षक श्री विद्यानंद पिळणकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व या प्रसंगी विद्यालय संस्थेला भौतिक सुविधा उपलब्ध देणारे श्री महेश धुरी,श्री आनंद तेंडोलकर,श्री दत्ताराम सावंत यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या उज्वल यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षिका सौ.अर्चना चव्हाण व क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सहा.शिक्षक श्री विश्वास धुरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना माजी शिक्षिका सौ.सुमन धुरी यांनी तसेच कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री सागर शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परीचय मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षक श्री विद्यानंद पिळणकर यांनी यांनी केले व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सहा.शिक्षक श्री एकनाथ कांबळे यांनी केले.

साळगाव (प्रतिनिधी)

error: Content is protected !!