विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल च्या विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भरारी

ओम बालम ची प्रज्ञासाठी तर वेदक खोचरे व वेद वाळके याची होमी भाभा बालवैज्ञानिक प्रात्यक्षिक साठी निवड
विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल या ठिकाणी विद्यार्थ्यांची बौद्धिक शैक्षणिक पातळी वाढविण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येतात.
बौद्धिक खेळ ,प्रात्यक्षिके, शास्त्रज्ञांची व तज्ञांची व्याख्याने, क्षेत्रभेटी , निसर्ग शाळा , कौशल्यनिष्ठ प्रशिक्षण अशा विविध उपक्रमातून मुलांची चौकसता ,कल्पकता, निरीक्षण शक्ती , प्रकल्प सादरीकरण याला चालना मिळत आहे.
या सर्व उपक्रमातून प्रशालेचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश संपादन करीत आहेत. ओम भूषण बालम या पाचवीतील विद्यार्थ्यांने गणित प्राविण्य परीक्षेत उत्तुंग यश मिळविले असून त्याची प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली आहे.
डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक च्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी वेदक विवेक खोचरे व वेद विकास वाळके यांची निवड झाली आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातही मुलांनी आपल्या विद्वत्तेची चमक दाखवली. छास्त्र प्रबोधिनी पुणे आयोजित राज्यस्तरीय अभिवाचन व हस्तलिखित स्पर्धेतही प्रशालेचे दोन संघ सहभागी झाले आहेत.
इंटरनॅशनल जनरल ऑलिम्पियाड ,सायन्स ऑलिम्पियाड , मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड व इंग्लिश ऑलिम्पियाड या परीक्षांमध्येही मुलांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.
2023 24 या वर्षात प्रशालेत दीपस्तंभ चे यजुवेंद्र महाजन यांचे व्याख्यान, होमी भाभा सायन्सचे डॉ. जयंत जोशी यांची प्रात्यक्षिक कार्यशाळा, INYAS तर्फे आयआयटी व एचबीसीएस सी च्या तज्ञांची ऑलिंपियाड संदर्भात प्रात्यक्षिक कार्यशाळा, ज्ञान प्रबोधिनी पुणे विज्ञान दलाची प्रात्यक्षिक कार्यशाळा, दर शनिवारी निसर्ग शाळा, इंडियन न्यूक्लिअर सोसायटी व इंडियन नॅशनल यंग अकॅडमी ऑफ सायन्स, न्यूक्लिअर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अणुऊर्जा वापर जनजागृती कार्यशाळा असे अनेक उपक्रम प्रशालेतील विद्यार्थ्यांबरोबरच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरीता ही राबवण्यात आले.
प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य तसेच डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा मिळवलेल्या यशाबद्दल प्रशालेचे चेअरमन, संचालिका मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. व त्यांच्या पुढील टप्प्यांकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
कसाल (प्रतिनिधी)





