अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम पार…

मुंबई – राष्ट्रवादी रोजगार आणि स्वयंरोजगार सेलच्या पदनियुक्तीचा कार्यक्रम राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी येथे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या अध्यक्षा मेघाताई पवार यांच्या नियोजनात पहिल्यांदाच असा सेल तयार करून त्यामार्फत रोजगार आणि स्वयंरोजगारावर भरीव कामगिरी करून महिला, युवक, तसेच पुरुषांच्या सक्षमीकरणावरती काम करण्यात येत आहे. यासाठी अजितदादांनी सर्वांचे कौतुक केले तसेच सर्वांना शुभेच्छाही दिल्या आणि मार्गदर्शन केले.

या सेलच्या माध्यमातून पक्षाकडून अनेक शासकीय योजना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतील यासाठी सर्वांनी काम करावे अशी सूचना मेघाताई पवार यांनी पदाधिकार्‍यांना केल्या.

या पदनियुक्ती कार्यक्रमाच्या वेळेला जिल्हा तसेच तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, पक्षाचे सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!