स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या १०० व्या जयंती निमित्त खारेपाटण येथे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोज

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण या महाविद्यालयाच्या वतीने खारेपाटण शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या शतकमोहस्तवी जयंती निमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भव्य राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या दी.२० जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या जयंती निमित्त ही स्पर्धा खारेपाटण महाविद्यालयाच्या कै.चंद्रकांत परीसा रायबागकर सभागृहात सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे हे सलग १० वे वर्ष आहे. या स्पर्धेकरीता प्रथम पारितोषिक ९०००/- रुपये रोख व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिक रोख ७०००/- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच तृतीय पारितोषिक रोख ५०००/- रुपये व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम १०००/- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार असून या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
खारेपाटण महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेकरीता पुढील विषय ठेवण्यात आले आहेत.–
१. केंद्रीय निवडणूक आयोग – भारतीय लोकशाहीचे भवितव्य
२. सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुणाई
३. चंद्रयान मोहीम अभिमानास्पद,पण वाढत्या बेकरीचे काय ?
४. शेतकरी राज्यात सुखी लोकशाही दुःखी
५. पर्यावरण संवर्धनात युवकांची भूमिका
६. जागतिक अशांतता – धार्मिक व आर्थिक
वरील विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवण्यात आले असून ही स्पर्धा पूर्णतः निःशुल्क असून कोणत्याही प्रकारची फी असणार नाही. सादरीकरणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ८+२ एकूण १० मिनिटे इतका वेळ देण्यात येणार आहे.तरी ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी महविद्यालयाचे चालू शैक्षणिक वर्षाचे ओळखपत्र सोबत सबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे लेखी पत्र आणि ज्या विषयावर आपण स्पर्धेत बोलणार आहात त्या विषयाची लेखी प्रत सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे.सदर स्पर्धेत वरील विषयावर विचारमंथन होणार असून महाराष्ट्र राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,वक्तृत्व स्पर्धा समिती प्रमुख प्रा.तानाजी गोदडे यांनी केले आहे.
या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे खारेपाटण महाविद्यालयाचे प्रा.तानाजी गोदडे – ९९२१५१३८८४, प्रा.प्रकाश शिंदे – ७५१७०६९१३२,प्रा.गजानन व्हंकळी
- ७५०७४४४७४९,प्रा.माधवी पांचाळ – ७५०७३५६६१८ यांचेकडे नोदवावित असे आवाहन वक्तृत्व स्पर्धा संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





