वायंगणी ( ता. कणकवली ) येथील विकास कामांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

दि. ३ जानेवारी २०२४ या नवीन वर्षात वायंगणी गावासाठी आमदार नितेश राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सरपंच अस्मि प्रशांत लाड यांनी मागणी केलेल्या कामाना मोठ्याप्राणावर गावच्या विकासासाठी निधी मंजूर केला होता. यात वायंगणी गावची ग्रामपंचायत कार्यालय छोटेसे असल्याने नवीन ग्रामपंचायत कार्यालय मंजूर करून ग्रामपंचायत कार्यालय उभारणी साठी व विस्तारीकरण करण्यासाठी १९.५०/- लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच ग्रामपंचायत वायंगणी गावठाणवाडी ताम्हणकर वाडी ग्रामा – १७ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून २५ लक्ष व बजेट मधून २० लक्ष असे एकूण ४५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला. संभाजी बाणे घर ते ओहोळ कडे जाणारा रस्ता साठी ३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. अश्या एकूण ६७.५० लक्ष रुपयांचा निधीची कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. वायंगणी गावांसाठी प्रथमच येवढ्या मोठ्या प्रमाणत निधी दिल्या बद्दल ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सरपंच अस्मि लाड यांनी आमदार नितेश राणे यांना शिवप्रतीमा देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला.तसेच वायंगणी ताम्हणकर वाडी येथे रस्त्याचे भूमिपूजन केले त्यावेळी श्री आदिनाथ उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संदेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उदघाटन प्रसंगी सरपंच अस्मि लाड ,उपसरपंच-प्रताप फाटक,माजी वित्त व बांधकाम सभापती-बाळा जठार, माजी सभापती-दिलीप तळेकर, पं. स.सदस्या-तृप्ती मालवदे,भाजपा शक्ती केंद्र प्रमुख-सूर्यकांत भालेकर, बूथ अध्यक्ष-श्रीकृष्ण बाणे, प्रमोद जाधव,माजी उपसरपंच-संदीप सावंत, संदीप दळवी,सदस्य-संभाजी बाणे, सदस्या-शमिका सुतार,वायंगणी सरपंच -अस्मि लाड, प्रताप फाटक-उपसरपंच, सदस्य-संभाजी बाणे,उज्जवला लाड,वनिता सुतार,भारती परब,भाग्यश्री बाणे तसेच इतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच वायंगणी गावचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





