खारेपाटण हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न झाली, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खारेपाटण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या
शाखाधिकारी योगिता ढाणे मॅडम उपस्थित होत्या.
खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य संजय सानप सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.यावेळी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका गुरखे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी उलगडा केला. त्यानंतर खारेपाटण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकारी योगिनी ढाणे मॅडम यांनी सर्व विद्यार्थिनींना आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचे याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी शाळेचा इतिहास व विद्यार्थिनींचा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग याविषयी मार्गदर्शन केले.तर
या कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सचिन शेटये, अजय गुरसाळे, महिंद्रे मॅडम, कदम मॅडम, रायबागकर मॅडम उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावी सायन्स मधील विद्यार्थिनी कु.ईसवलकर हिने केले. तर आभार प्रदर्शन काझी मॅडम यांनी केले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





