आचरा शिवसेना विभाग प्रमुख पदी चंद्रकांत गोलतकर

शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व तालुका प्रमुख महेश राणे यांनी ही निवड सोमवारी जाहीर केली. चंद्रकांत गोलतकर यांनी शनिवारी उबाठा सेनेतून भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला होता. गोलतकर यांना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांच्या सहीने मिळालेल्या नियुक्ती पत्रात शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सदर नियुक्ती करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आचरा, अर्जुन बापर्डेकर