अबकी बार “भैय्याशेठ” खासदार ही कार्यकर्त्यांची भावना!

किरण सामंत यांना खासदारकीची उमेदवारी द्या!
शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेने तर्फे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ (भैय्या) सामंत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भैय्याशेठ सामंत यांचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी अतिशय जीव्हाळ्याचे सबंध आहेत. त्यांची काम करण्याची वेगवान पद्धत, तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता, विषयांची नियोजन बद्ध हाताळणी यामुळे दोन्ही जिल्ह्यातील असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्ते भैय्याशेठ यांना मानतात. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्याशी त्यांचे राजकारणा पलीकडे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. भैय्याशेठ यांनी खासदार व्हावे अशी सिंधुदुर्ग जिल्हयातील तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. “अब की बार भैय्या शेठ खासदार” अशी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळ उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील यांनी केली आहे.
कणकवली/ प्रतिनिधी