शिंदे गटातील उमेदवाराला लोकसभेचे उमेदवारी देण्यास आमचा विरोध!

लोकसभेच्या जागेवरून सिंधुदुर्गात भाजपा विरुद्ध शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांची प्रसिद्धी पत्रकार द्वारे पक्षाकडे मागणी

लोकसभेची निवडणूक काही महिन्यात होणार आहे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रथम पसंती ही माजी आमदार प्रमोद जठार ही आहे. प्रमोद जठार हे गेले अनेक वर्षे चिपळूण पासून दोडामार्ग पर्यंत कार्यरत असून त्यांनी आपली स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.
सन 2008 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या अडचणीच्या काळात प्रमोद जठार ठामपणे कार्यकर्त्याच्या मागे उभे राहिले आणि भारतीय जनता पार्टी पक्ष वाढविला. गेली दहा वर्ष असे कोणतेही विशेष पद नसताना देखील प्रमोद जठार यांनी विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम केले. गावा गावात संघटना उभी करण्यासाठी प्रयत्न केले. आज चिपळूण पासून दोडामार्ग पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सर्व संबंध कार्यकर्त्याची इच्छा प्रमोद जठार खासदार म्हणून बघणे ही आहे. अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य व माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी केली आहे.
आज भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची युती आहे. हा मतदार संघाची तिकीट शिंदे गटाचे उमेदवाराला देण्यात यावे अशी मागणी वारंवार शिंदे गटाकडून होत आहे परंतु सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा याला कडाडून विरोध आहे.
शिंदे गटाकडून वारंवार किरण सामंत हे नाव पुढे येत आहे. या नावाला काही प्रमाणात प्रसिद्धी देखील मिळत आहे परंतु गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादी शिवसेना आणि आता शिंदे गट असा प्रवास करून येणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून कसे काय स्वीकारायचे हा प्रश्न सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे.
आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, हे सर्व नेते भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी जोरदार काम करत आहेत. माझ्या सर्व नेत्यांना विनंती आहे, की आपण सर्वांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विनंती करून माजी आमदार प्रमोद जठार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करावेत.
गेले अनेक महिने भारतीय जनता पार्टी संघटन या मुद्याखाली कार्यकर्त्याकडून अनेक संघटनात्मक कामे वेगवेगळ्या माध्यमातून पूर्ण करून घेत आहे व कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार देखील केला जाऊन प्रमोद जठार सारख्या योग्य माणसाला जबाबदारी मिळावी.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!