महेश सरनाईक यांना गौड ब्राह्मण सभेचा आदर्श पत्रकार पुरस्कार

२५ डिसेंबरला दादर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण

कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार तथा लोकमतचे उपमुख्य उपसंपादक, सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक यांना यावर्षीचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ डिसेंबरला मुंबई, दादर येथील शारदाश्रम शाळेत सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबईचे १२६ वे वार्षिक स्नेहसंमेलन २५ डिसेंबरला शारदाश्रम विद्यामंदिर दत्तमंदिर सभागृह, भवानी शंकर मार्ग, दादर पश्चिम मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरे होणार आहे.
समारंभाचे अध्यक्ष बेळगाव येथील संजय विद्यानंद कुळकर्णी असणार आहेत. यावेळी कार्याध्यक्ष वीणा दाभोलकर, अध्यक्ष जगदीश वालावलकर, उपाध्यक्ष देवदत्त खानोलकर, मधुकर सामंत, खजिनदार योगेश खानोलकर, कार्यवाह महेश राळकर, कार्यवाह यशवंत बागलकर, विश्वस्त नरसिंह पंतवालावलकर आदी उपस्थित राहणार आहेत.
२५ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत शारदाश्रम विद्यामंदिरच्या सभागृहात वधुवर व पालक मेळावा होणार आहे. यामध्ये सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील २४ वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारितेत आदर्शपणा राखत समाज भूषण ठरणारे पत्रकार तथा लोकमतचे उपमुख्य उपसंपादक आणि सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक यांना स्व. रावबहादूर वासुदेवराव अनंतराव बांबर्डेकर इतिहास संशोधन/साहित्य, पत्रकारिता/प्रकाशन कार्याकरीता पुरस्कार, स्व. बा. नी. देसाई आदर्श समाजसेवा पुरस्कार मुंबई सांताक्रुझ येथील शांताराम केळुसकर, स्व. डी. पी. नाईक आदर्श स्वयंसेवक पालघर येथील विजय वालावलकर, स्व. सुर्याजी रामकृष्ण (काका) कोचरेकर आदर्श समाजसेवक पुरस्कार कुडाळ येथील श्रीमती शैलजा शेखर सामंत यांना तर गौड ब्राह्मण सभेच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार कणकवली, फोंडा येथील दत्तकुमार (सुरेश) वामन सामंत यांना जाहीर झाला आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!