कारच्या धडकेत जखमी झालेल्या “त्या” महिलेचा अखेर मृत्यू

जानवली रतांबी व्हाळ या ठिकाणी धडक देऊन कार चालकाने केले होते पलायन

पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू

सफेद रंगाच्या चार चाकी ने जोरदार धडक दिल्याने या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार अंजली अमित साळवी (वय 37, रा. शिवाजीनगर कणकवली ) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. आज गुरुवारी सायंकाळी आपल्या बहिणीला जानवली रतांबी व्हाळ येथे घरी सोडून अंजली साळवी या मिडल कट जवळून वाळण्याकरिता कणकवली च्या दिशेने येत असताना कार ने जोरदार धडक देत पलायन केले. जखमी अवस्थेत अंजली साळवी याना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी एपीआय मनोज पाटील, पोलीस नाईक रुपेश गुरव, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव, भूषण सुतार यांनी भेट देत प्राथमिक पाहणी केली. मयत अंजली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. या धडक देऊन पळालेल्या कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले असून कारचा काही भाग महामार्गावर मोडून पडला होता. कार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!