दुचाकीस्वार महिलेला धडक देत कार चालकाचे पलायन

अपघातात महिला गंभीर जखमी
महिला 50 फूट गेली धडकेनंतर फरफटात
खारेपाटण च्या दिशेने जाणाऱ्या सफेद कलरच्या कार ने जोरदार धडक दिल्याने जानवली रतांबि व्हाळ या ठिकाणी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज गुरुवारी सायंकाळी 5. 40 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची तीव्रता एवढी होती की ज्या दुचाकीला धडक दिली ती दुचाकीस्वार महिला जवळपास 50 फूट महामार्गावर फरफटत गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तर गाडीच्या अक्षरशा चंदामेंदा झाला. मात्र धडक दिलेला कारचालक त्याच स्थितीत खारेपटणच्या दिशेने कार सह पळून गेला. या अपघातामुळे महामार्गावर नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
दिगंबर वालावलकर /कणकवली