जत्रोत्सवातील जुगार बंद करा

युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस यांची मागणी

प्रतिनिधी l दोडामार्ग जत्रोत्सवातील अंदर बाहर जुगार एक तर बंद करा नाहीतर राजरोसपणे खेळायला परवानगी द्या, अशी मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली आहे.
सध्या जिल्ह्यात जत्रोत्सव सुरु झाले आहेत. गावागावांत जत्रोत्सव सुरु झाल्याची संधी साधत अंदर बाहर जुगाराचे पट मांडणारे अनेकजण सक्रिय झाले आहेत.
तालुक्यातही जत्रा सुरु झाल्यात. इथल्या जत्रांमध्येही पट मांडणारे येणार आहेत. पोलिस आणि स्थानिकांना हाताशी धरून काही जत्रोत्सवात ते पट मांडतात तर काही ठिकाणी ते जात नाहीत. जी जत्रा पोलिसांकडे ठरते तेथेच ते जातात, त्यामुळे पोलिसांनी एकतर सर्वच ठिकाणी जुगाराला त्यांनी परवानगी द्यावी अन्यथा जत्रेतील जुगारच बंद करावा अशी मागणी श्री. गवस यांनी केली आहे.

तर गावागावातील जुगार बंद पाडू पोलिसांनी याची दखल गांभीर्याने घेतली नाही तर गावागावांत जाऊन जत्रोत्सवातील जुगार शिवसेना स्टाईलने बंद पाडू, असा इशारा भगवान गवस यांनी दिला आहे.

error: Content is protected !!