वनपाल सत्यवान सुतार यांना पत्नी शोक

वनपाल सत्यवान सुतार यांना पत्नी शोक
भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांच्या पत्नी सुप्रिया सत्यवान सुतार ( वय 42, रा. नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट, मूळ रा. कुर्ली सुतारवाडी, ता. वैभववाडी ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने 12 डिसेंबर रोजी दुपारी दुःखद निधन झाले. सुप्रिया याना अत्यवस्थ वाटू लागल्यामुळे कणकवली येथील खाजगी रुग्णालयात 12 डिसेंबर रोजी सकाळी दाखल करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर कुर्ली गावातील स्मशानभूमीत आज सकाळी अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चत पती, 2 मुली, 1 मुलगा, सासू असा परिवार आहे.सुप्रिया यांच्या अकाली निधनाने सुतार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुर्ली गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कणकवली प्रतिनिधी