परुळेकर आपण एवढे पण मोठे नाही, आणि ज्योतिषी पण नाही!

आमच्या आशिर्वादा शिवाय आधी नगरसेवक होऊन दाखवा नंतर टीका करा!

ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांचे शिवसेना तालुकाप्रमुख यांना प्रत्युत्तर

आता पर्यंत आमदार वैभव नाईक यांचं बोट धरून भूषण परुळेकर यांनी राजकारण केले. आणि भवितव्य अधांतरी वैगरे ठरवण्या येवढे आपण मोठे नाहीत. अथवा ज्योतिषी नाहीत. भूषण परुळेकर यांनी आमदार वैभव नाईक यांची काळजी करू नये. आपल्या पदाची, पक्षाची काळजी करावी. ३१ डिसेंबर ला आपलं काय ते चित्र स्पष्ट होईल च असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी लगावला आहे. तसेच
तुम्ही सर्व प्रथम कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आमच्या आशिर्वाद शिवाय साधे नगरसेवक होऊन दाखवा. नंतर आमदार वैभव नाईक यांच्या भवितव्याची चिंता करा असा टोला श्री मसुरकर यांनी लगावला आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!