भाजपा आयोजित बेटी बचाव बेटी पढाव रांगोळी स्पर्धेत श्रेया चांदरकर प्रथम

जिल्हा बँक संचालक प्रज्ञा डाऊन यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन
स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाव या अभियानांतर्गत लक्ष्मी विष्णू हाॅलमध्ये जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. मोदी सरकारने महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनांवर आधारीत या रांगोळी काढण्यात याव्यात. असा स्पर्धेकांना उद्दिष्ट दिले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रेया समीर चांदरकर,मालवण द्वितीय क्रमांक पूर्वा रामदास चांदरकर कट्टा, तृतीय क्रमांक शांभवी उल्हास कुलकर्णी, कनेडी यांनी पटकावला. तर शर्वरी ओंकार जाधव,कलमठ प्रियाली सुरेंद्र कोदे कणकवलीआणि दीप्ती राणे कणकवली यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रज्ञा ढवण, उपाध्यक्षा महिला मोर्चा ,महाराष्ट्र राज्य, भारतीय जनता पक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.
रांगोळी ही भारतीय संस्कृती आहे. महिला आणि रांगोळी यांच एक अतूट नाते आहे. त्यामुळे रांगोळीच्या माध्यमातून भारत सरकारने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोचवण्याच काम भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ बेटी पढाव या अभियानातर्फे करत आहे. यापुढेही महिला आणि मुलींमध्ये कलासंस्कृती वाढावी यासाठी स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत राहू असे आश्वासन बेटी बचाओ बेटी पढाव च्या संयोजक मेघा अजय गांगण यांनी केले. तर मोदी सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहीती प्रज्ञा ढवण यांनी दिली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कणकवली तालुका उपाध्यक्षा संजना सदडेकर, शहर अध्यक्षा प्राची कर्पे, बेटी बचाओ च्या सदस्या साक्षी वाळके उपस्थित होत्या.
स्पर्धेचे परीक्षण विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक प्रसाद राणे सर यांनी केले.
कणकवली, प्रतिनिधी