कणकवली न्यायालयात लोकअदालतीमध्ये प्रलंबित, ई-चलन व वादपूर्व अशी एकूण प्रकरणे १८१ निकाली

लोक अदालतीमध्ये ९ लाख, ४४ हजार ४२३ वसुली

कणकवली न्यायालयात ‘राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आलेले होते. मा. श्री. टी. एच. शेख, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती कणकवली तथा दिवाणी न्यायाधीश (क. स्तर), कणकवली व मा. श्री. एम. बी. सोनटक्के, सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर), कणकवली व मान्यवर प्रमुख अतिथी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या ‘राष्ट्रीय लोकअदालत’ मध्ये दोन्ही न्यायालयातील प्रलंबित ९ दिवाणी, २७ फौजदारी २२ ई-चलन व १२३ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली करण्यात आली. फौजदारी व ई-चलन कडील वसुली रक्कम रु. २१३,५००/- व राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत, म.रा.वि.वि.कंपनी यांनी वसुलीसाठी दाखल केलेल्या वादपूर्व प्रकरणापैकी १२३ प्रकरणे निकाली
करुन रक्कम रु.७,३०९२३/- इतकी करण्यात आली. कणकवली वकील संघटनेचे सदस्य, श्रीम बरगे सहा पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, कणकवली, श्री. प्रमोद ठाकूर, कृषी अधिकारी, पंचायत समिती कणकवली व कणकवली न्यायालयाचे कर्मचारी श्रीम.एस.पी. सावंत, सहा. अधी, (प्रशा.), श्रीम.एस.पी. जाधव, सहा. अधी. (वित्त), श्रीम. कुडाळकर, लघुलेखक, श्रीम.एस.एस. जाधव, व. लिपीक, सौ. आचार्य व लिपीक, सौ. वाळके श्री तोरस्कर, श्री. कांबळे, श्री. शेलटकर, सौ. लोबो क. लिपीक व श्री. जाधव, श्री. बामणे यांचे सहकार्य लाभले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!