सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग चा जिल्हा वारकरी मेळावा ३१ डिसेंबर ला दोडामार्ग येथे

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग दर वर्षी होणारा वारकरी जिल्हा मेळावा रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा अध्यक्ष मा. ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व जिल्हा कार्यकारिणीच्या उपस्थितीत दोडामार्ग येथे होणार आहे यावर्षीचा वारकरी जिल्हा मेळाव्याचा मान दोडामार्ग वारकरी संप्रदायास मिळाला आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
तसेच दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय मार्फत देण्यात येणारा मानाचा संतसेवा पुरस्कार या मेळाव्यात दिला जाणार आहे, तरी जिल्ह्यातील वारकरी संप्रदायात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जेष्ठ कीर्तनकार,प्रवचनकार,मृदंगमणी यांनी या पुरस्कारासाठी आपल्या पोस्ट साईज फोटो व आपल्या सर्व माहीतिसह अर्ज दिनांक १५ डिसेंबर २०२३ पूर्वी करावेत व अधिक माहितीसाठी ह. भ.प.गवंडळकर महाराज 9420261934संपर्क साधावा.याची जिल्ह्यातील सर्व वारकरी बांधवांनी नोंद घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
श्री.राजू राणेसचिव सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे आवाहन.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!