जे न देखे कवी ते देखे “रवी” चव्हाण !

भारतीय सागरी आरमाराचे प्रमुख आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण भूमीत यावर्षीचा नौदल दिन ४ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. ही घटना मालवणच नव्हे तर साऱ्या कोकणाला….. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी आहे. या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेल्या आणि सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा गाभा असलेल्या मालवण शहरातील राजकोट येथे नौदल आणि शासन मार्फत ४३ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला असून या पुतळ्याचे अनावरण भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. खरतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यामुळे मालवण राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त झाले आहे. आणि हे प्राप्त होतानाच मालवणला बारमाही पर्यटन स्थळही उपलब्ध झाले आहे. ही गोष्ट मालवणच्या पर्यटन उद्योगाला नवा आयाम देणारी ठरली आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परंतु मालवणच्या पर्यटनाला नवा आयाम देण्याच काम जर कोणी केल असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाणजी यांच्या मुळे आणि भाजप या राष्ट्रीय पक्षामुळे हे सारे शक्य झाले. खरतर मराठीत एक म्हण आहे ” जे न देखे रवी ते देखे कवी” परंतु मराठीतील ही प्रचलित म्हण बदलण्याचे सामर्थ्य केवळ ७२ दिवसात मालवण राजकोट किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे ना. रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते म्हणून याबाबतीत बोलायचे झाले तर ‘जे न देखे कवी ते देखे रवी’ म्हणजेच ना. रवींद्र चव्हाण साहेब होय.

वस्तूत: पाच महिन्यापूर्वीची ही घटना आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात आजच्या ४ डिसेंबरला होणाऱ्या नौदल दिनाचे जणू शुभसंकेत द्यावेत त्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची सागरी राजधानी असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग बाबतचा उल्लेख करून मालवणलाच नव्हे तर संपूर्ण कोकण वासियांना किंबहुना महाराष्ट्राला सुखद धक्का दिला होता. मन की बात मध्ये विविध विषयावर मत व्यक्त करणारे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे असे पहिले पंतप्रधान आहेत की लोकांच्या मनाचा ठाव घेत त्यांच्या मनातील आशा आकांशा पूर्तीसाठी मन की बात मधून मत मांडताना ते सत्यात उतरविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. हे त्रिकालाबाधित सत्य आहे म्हणून तर मालवणच्या राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा साकार झाला आणि तो साकार होण्याचे शिव धनुष्य केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे साहेब यांच्या सहयोगाने, माजी खासदार निलेश राणे यांच्या साथीने आणि मुख्य म्हणजे भाजप कार्यकर्त्यां बरोबरच प्रशासनाच्या मदतीने पेलण्याचे काम या जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी केले आहे . हे काम एकट्या दुकट्याचे नाही हे सर्वश्रुत आहे. असे असले तरी प्रत्येक घटनेला सेनापती लागतो आणि ते सेनापती पदाची जबाबदारी यशस्वी रित्या निभावण्याचे काम पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण साहेब हे करीत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे मालवणशी नाते संबंध आहेत. आणि हे नाते संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने ना. चव्हाण साहेब यांनी यापूर्वी आणि आताही अनेक विकासाची कामे करून ते दाखवून दिले आहे. खरतर नौदलाचा ५१ वा वर्धापन दिन हा मालवणच्या भूमीत होतोय. यापूर्वी दिल्लीत होणारा हा नौदल दिन प्रथमच मालवण सारख्या ग्रामीण भागात होतोय. ही साऱ्यांच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब आहे. दोन वर्षापूर्वी नौदलाची मुद्रा असणारा झेंडा पंतप्रधानांनी फडकवला होता आणि दोन अडीच महिन्यापूर्वी नौदल आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने मालवण मध्ये शिवपुतळा साकरण्याची संकल्पना मांडण्यात आली त्यावेळी या शिव पुतळ्यासाठी जी जागा निवडण्यात आली ती छत्रपती शिवाजी महाराज यांची सागरी राजधानी असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्ग अशी निवडण्यात आली होती. मात्र याठिकाणी शिव पुतळा उभारणीच्या कामाला अडचणी येताच पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी किल्ले सिंधुदुर्गच्या समोरील राजकोट भागाची निवड केली. वस्तुत: या भागात राजकोट किल्ल्याचे कोणतेही अवशेष नसताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी आपल्या खात्या मार्फत राजकोट किल्ल्याची जागा मुक्र करताना राजकोट किल्ल्याचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने सोडला. राजकोट भागातील शासकीय जागा हस्तानतरित करण्यात आली. कमी वेळेत संकल्प सिद्धी करावयाची होती हे जाणून संपूर्ण प्रशासनाला कामाला जंफले संकल्प पूर्ती झालीच पाहिजे हा आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिला. ना. रवींद्र चव्हाण यांनी सोडलेल्या संकल्प सिद्धीला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी भारतीय नौदलाने सुयोग्य साथ दिली. राजकोट किल्ल्याचे पुनरुज्जीवन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा याबाबत रवींद्रजी चव्हाण यांच्या बरोबरच नौदलाने कणखर बाणा दाखवला आणि म्हणून कमी वेळेत अशक्य वाटणारे हे काम शक्य करण्याचे सामर्थ्य ना. चव्हाण साहेब यांनी दाखविले. आणि हे करत असताना ना. चव्हाण साहेब यांनी जी कल्पकता दाखविली ती तर वाखन्याजोगी आहे. आदरणीय पंतप्रधान यांनी काही महिन्यापूर्वी मेरी मिट्टी मेरा देश हा उपक्रम राबविला त्या अंतर्गत ३८ किल्ल्याची माती गोळा करून छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबूतऱ्यामध्ये पायाभरणी समारंभाचे औचित्य साधून अर्पण करण्यात आले. खरतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी “अपनी विरासत पर गर्व करो ” हे जे सांगितले त्याची अंमलबजावणी करण्याचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. स्वच्छते बाबतीतही नवा आयाम देण्याच काम प्रशासनाला हाताशी धरून करतानाच त्याला लोक सहभागाची जोड दिली. त्यामुळे या सर्व घटनेत विरोध हा झाला नाही. राजकोट किल्ल्याचे पुनरुज्जीवन करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याठिकाणी किल्ले सिंधुदुर्गची पायाभरणी केली त्या मोरयाचा धोंडा याठिकाणी नवी वास्तू उभी राहणार आहेच शिवाय अनेक किल्ल्याचा विकास होण्याच्या दृष्टीने पालकमंत्री श्री. चव्हाण साहेब आणि भाजपने एक ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे पर्यटनाला एक निश्चितपणे उभारी मिळेल आणि त्यासाठी मालवण राजकोट किल्ल्याचे पुनरुज्जीवन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण ही येणाऱ्या विकासाची नांदी ठरेल आणि ती ठरावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!

प्रभाकर सावंत,
जिल्हाध्यक्ष – भाजप, सिंधुदुर्ग

error: Content is protected !!