शिक्षकासाठी देवगडमध्ये रस्ता रोको मुळे प्रशासन कोंडीत

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांचा आंदोलनाला पाठिंबा

अखेर प्रशासन नरमले, 5 डिसेंबर रोजी चर्चेसाठी बैठक

देवगड तालुक्यातील शिरगाव चौकेवाडी येथील शाळेमध्ये तीन शिक्षक आवश्यक असताना तेथील एक शिक्षक अन्यत्र पाठवल्याने याबाबत तेथील पालक व ग्रामस्थांनी रास्ता रोको चा इशारा देऊनही त्यावर कोणती दखल न घेतल्याने प्रशासनाच्या विरोधात शिरगाव येथे रस्ता रोको करण्यात आला. शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, व शिवसेना संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. शासन नियमाप्रमाणे 20 मुलांना 2 शिक्षक आणि 20 च्या वर पटसंख्या असेल तर 3 शिक्षक आवश्यक आहेत. या शाळेमध्ये 21 विद्यार्थी असताना देखील 1 शिक्षक अन्यत्र पाठवल्याने या विरोधात पालकांनी आक्रमक भूमिका घेतली. मोठा पोलीस बंदोबस्त ही या ठिकाणी ठेवण्यात आला होता. यावेळी पालक व ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिके नंतर अखेर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी नरमाई ची भूमिका घेत 5 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता पंचायत समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाला युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. व पाठिंबा दिला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप, श्रीरंग काळे, अंकुश जंगले, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सुधीर कदम, चंद्रशेखर साटम, मिलिंद साटम, रवींद्र जोगल, प्रथमेश तावडे, संजय राणे, राजू राणे, पांडू घाडी आदी उपस्थित होते.

देवगड /प्रतिनिधी

error: Content is protected !!