बसच्या वेळा पाळा, नाहीतर डेपोला टाळे ठोकू !
उबाठा सेनेचा कुडाळ एसटी प्रशासनाला इशारा
निलेश जोशी । कुडाळ : एसटी बस वेळेत सुटल्या नाहीत तर कुडाळ एसटी आगाराला टाळे ठोकणायचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आगार व्यवस्थापक कुडाळ याना देण्यात आला. सरंबळला येणारी सकाळी ७ वाजता आणि दुपारी १ वाजता येणारी गाडी उशिरा येत असल्यान तेथील विद्यार्थ्यंचे वेळेवर शाळेत पोहोचता न आल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे उबाठा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगरप्रमुखांचे लक्ष वेधले.
कुडाळमधून सकाळी ६ वाजता सुटणारी सरंबळ हाही बस सरंबळ येथे ६.३० वाजता पोहोचणे अपेक्षित आहे. पण ती उशिरा सुटते त्यामुळे ती सरंबळ येथे सकाळी ८ वाजता पोहोचते. तसेच दुपारी १ वाजता सरंबळ येथे येणारी बस दुपारी ३ वाजता येते. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशी यांची गैरसोय होत असल्याचे आगारप्रमुख यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी वाहतूक निरीक्षक श्री. नर आणि श्री. राठोड यांची भेट उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.. तसेच यापुढे बस नियोजित वेळेत न सुटल्यास एस टी डेपोला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला..
यावेळी शिवसेना उ. बा. ठा पक्षाचे तालुका प्रमुख राजन नाईक, तसेच सरंबळ शाखाप्रमुख शाम करलकर, उपशाखाप्रमुख संदीप पाटकर, युवासेना उपविभाग प्रमुख वैभव सरंबळकर, युवासेना शाखा प्रमुख निखिल गोसावी, युवासेना गटप्रमुख मयूर भोवर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते..
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.