ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड.असीम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात

विविध क्षेत्रातील व्यक्तींशी साधणार संवाद
प्रतिनिधी । कुडाळ : ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात येत आहेत. त्यांच्यासोबत जेंडर राईट विश्लेषक ऍड. रमा सरोदे व कायदेविषयक कामकाज व्यवस्थापन तज्ञ ऍड. बाळकृष्ण निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. कुडाळ येथील मराठा हॉल सभागृहात सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत विविध क्षेत्रातील लोकांशी ते चर्चा करणार आहेत. तसेच राज्यभर राबविण्यात राबविण्यात येणाऱ्या ‘निर्भय बनो’ अभियानविषयी माहिती देणार आहेत. त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, पर्यावरण विषयक प्रश्न जाणून घेणार असून नवोदित वकील मित्रांशी आणि पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत. जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, प्रकल्पग्रस्त, नवोदित वकील यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ऍड. किशोर वरक यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.