अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी कुणाल गुरव याची सशर्थ जामीनावर मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. राजेश परुळेकर यांचा युक्तिवाद

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुणाल संतोष गुरव जांभवडे – तालुका वैभववाडी याला विशेष न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी सशर्थ जामीनवर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने ऍड. राजेश परुळेकर यांनी काम पाहिले. अल्पवयीन पीडित मुलगी ही विरोध करत असतानाही संशयित कुणाल गुरव यांने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार वैभववाडी पोलिसात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी 15 ऑक्टोबरला गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या प्रकरणात संशयित आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी संशयित आरोपीच्या वतीने ऍड परुळेकर यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत संशयित आरोपी ची 15 हजाराच्या सशर्थ जामीनावर मुक्तता केली.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!