सिरॉक ग्रुप आचरा* व रंगभूमी गावातलीयांच्या तर्फे कंदिल स्पर्धा

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा चिंदर, त्रिंबक, वायंगणी गाव मर्यादित सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गावातली यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे कंदिल स्पर्धा ” आयोजित केली आहे.यासाठी
प्रथम क्रमांक रुपये ४००१/-
द्वितीय क्रमांक रुपये ३००१/-
तृतीय क्रमांक रुपये २००१/-
उत्तेजनार्थ प्रथम आणि उत्तेजनार्थ द्वितीय प्रत्येकी रुपये ५०० /
अशी आहेत.यासाठी
: दिनांक १४ नोव्हेंबर पर्यंत कंदिल तयार करून तो आपण आपल्या दाराबाहेरील रस्ता किंवा पाणंद किंवा पायवाट या ठिकाणी किमान १० ते १५ फूट उंची वरच लावावा, जेणेकरून परीक्षण करणे सोपे जाईल.
परीक्षक आपल्या घरी येऊन आपल्या कंदीलाचे परीक्षण करणार आहेत.कंदीलाची लांबी, रुंदी,उंची कमीत कमी दोन फूट असावी, तसेच त्यामध्ये विद्युत दिवा, (बल्ब) असणे आवश्यक. ज्यामुळे आपले घर, परिसर, वाडी,गाव प्रकाशमान होईल.
आपल्या कंदीलाचा युट्युब व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे आपले कौशल्य इतरांनाही कळेल. हाच व्हिडिओ बक्षीस समारंभ प्रसंगी सुद्धा दाखवला जाईल.
संपूर्ण कंदील बनवण्याचा किंवा बनवताना चा व्हिडिओ बनवावा, परीक्षक किंवा आयोजक यांनी तो मागल्यास द्यावाच लागेल. अन्यथा आपला कंदील विचारात घेतला जाणार नाही. कंदील बनवताना व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड असणे आवश्यक. ( स्थानिक पुराव्यासाठी ). ते देखील मागण्याचे किंवा विचारण्याचे अधिकार परीक्षक व आयोजक यांच्याकडे राहील.
स्पर्धेमध्ये कुटुंब,फ्रेंड्स सर्कल बचत गट, वाडी मंडळ, महिला मंडळ म्हणजेच पंचक्रोशीतील कोणीही भाग घेऊ शकतात.स्पर्धेसाठी परीक्षण झाल्यानंतर लवकरच आपणाला बक्षीस वितरण समारंभात बोलवण्यात येईल. नोंदणी करतेवेळी आपला व्हाट्सअप नंबर आवश्यक आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये 150 रु असून अधिक माहिती साठी
अनिकेत पांगे९४२०२६०७१६,
रुपम टेमकर 91 ९१६८१०७०१०
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशिका सी कॅफे आचरा हॉटेल सिरॉक शेजारी, मिळतील




