कुडाळ उपविभागातील पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर

कुडाळ महसूल उपविभागातर्गत कुडाळ तालुक्यातील ६६ व मालवण तालुक्यातील ८९ अशा एकूण १५५ रिक्त पोलिस पाटील पदांची सोडत चिठ्ठीद्वारे पार पडली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २०, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १७, विशेष मागास प्रवर्गासाठी २, विमुक्त जाती प्रवर्गासाठी २, भटक्या जमाती ब प्रवर्गासाठी ६, भटक्या जमाती क प्रवर्गासाठी ७, इतर मागास प्रवर्गासाठी २२, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १६ तर खुल्या प्रवर्गासाठी ६३ अशी मिळून १५५ रिक्त पोलिस पाटील पदांची सोडत जाहीर झाली.
कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवारी हा सोडतीचा कार्यक्रम प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या उपस्थितीत झाला. तहसीलदार अमोल पाठक, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, मालवण सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार, नायब तहसीलदार प्रदीप पवार, प्रांत विभागाचे अव्वल कारकून ए.एन. चव्हाण, कृष्णा लाड, महसूल सहाय्यक दीपक नाईक आदी उपस्थित होते.
पोलिस पाटील पदाची सोडत चिठ्ठीद्वारे चिन्मय गणेश गोसावी या पाच वर्षीय मुलाच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित एकूण २० पदांसाठी महिला आरक्षित कुडाळ – कांडरगांव, मालवण घाडीवाडी, मालवण खरारे व डिकवल, कुडाळ- बांव, मालवण- पलीकडीलवाडी. उर्वरित
कुडाळ तालुक्यातील कांडरगाव, चाफेली, नाईकवाडी, वालावल, देऊळवाडी, साईगांव, केरवडे तर्फ माणगाव, जांभरमळा तर मालवण तालुक्यातील धामापूर, तळगांव, चौके, कुणकवळे, सुकळवाड, मळा, पालियेवाडी ही गावे अनुसूचित जाती प्रवर्ग उमेदवारांसाठी आरक्षित झाली आहेत.
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १७ पदे
अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकुण १७ पदे असून यामध्ये कुडाळमधील गुढीपूर, घाटकरनगर, रूमडगांव, निरूखे व मालवण तालुक्यातील मर्डे ही गावे अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित तर मालवण तालुक्यातील कुसरवे, गुरामवाड, पोईप वायरी, पिरावाडी, कोळंब व कुडाळ तालुक्यातील टेंबधुरीनगर, नमसगाव, तळेगाव, गवळगांव, सांगिर्डे, हुमरमळा ही गावे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
विशेष मागास वर्गासाठी २ पदे
मालवण तालुक्यातील तारकर्ली व वराड ही दोन गावे विशेष मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून यामधील तारकर्ली पोलिस पाटील पद विशेष मागास प्रवर्ग महिला आरक्षित आहे.
विमुक्त जाती प्रवर्गासाठी २ पदे
विमुक्त जाती प्रवर्गासाठी मालवण तालुक्यातील सडेवाडी व कुडाळ तालुक्यातील गोवेरी ही दोन गावे आरक्षित झाली आहेत. यामध्ये गोवेरी गाव विमुक्त जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.
भटक्या जमाती व प्रवर्गासाठी ६ पदे भटक्या जमाती व प्रवर्गासाठी ६ पदे
आरक्षित असून यामध्ये कुडाळ तालुक्यातील खोचरेवाडी व नमसपूर ही दोन गावे महिलांसाठी आरक्षित आहेत. तर मालवणमधील गवळीवाडा व चाफेखोल तसेच कुडाळमधील ढोलकरगाव व खुटवळवाडी ही गावे भटक्या जमाती ब सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
भटक्या जमाती (क) प्रवर्गासाठी ७ पदे
भटक्या जमाती क प्रवर्गासाठी ७ पदे आरक्षित असून मालवण तालुक्यातील अपराजवाडी व कुडाळ तालुक्यातील मिटक्याचीवाडी ही दोन गावे महिलांसाठी आरक्षित आहेत. तर कुडाळ मधील गोठोस, मोरे, नेहरूनगर, भूतवड, मुंड्याचा कोंड ही गावे भटक्या जमाती (क) प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
इतर मागास प्रवर्गासाठी २२ पदे
इतर मागास प्रवर्गासाठी २२ पदे आरक्षित झाली असून मालवण तालुक्यातील सर्जेकोट, ओझर, वाक, काळेथर, कोथेवाडा, गावकरवाडा व माळकेवाडी ही गावे महिलांसाठी आरक्षित आहेत. तर कावा, तोंडवली, जुवापानखोल, मळावाडी, सोनारवाडी व कुडाळ तालुक्यातील बेलनदी, मुनगी, बोरभाट, गावघड, भट्टगाव, कट्टागाव, गांधीग्राम, नाईकनगर, गांधीनगर व झाराप ही गावे इतर मागास सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत.
आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी १६ पदे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी १६ पदे आरक्षित झाली असून यामध्ये मालवण तालुक्यातील खाजनवाडी, कलचाव्हाळ, मागवणे, विळवस व कुडाळ तालुक्यातील टॅमगाव ही गावे महिलांसाठी आरक्षित आहेत तर मालवण मधील भटवाडी, खेरवंद, महान, भोगलेवाडी, कातवड, वाडीडांगमोडे, आमवने, टेंमवाडी व कुडाळ तालुक्यातील दुर्गानगर, सार्कीडे, मडगांव ही गावे आर्थिक दुर्बल सर्वसाधारण घटकांसाठी आरक्षित आहेत.
खुल्या प्रवर्गासाठी ६३ पदे
खुल्या प्रवर्गासाठी ६३ पदे आरक्षित झाली असून यामध्ये कुडाळ तालुक्यातील कांदुळी, भरणी, पांग्रड, साळगांव, गोंदयाळे, तळीगांव तर मालवण तालुक्यातील खांद, पेडवे, शिरखंडे, बागवेवाडी, खोटले, फळसंब, वाघवने, परबवाडा, पालकरवाडी, बागवाडी, शिमाडराणेवाडी, कुंभारवाडी ही गावे महिलांसाठी आरक्षित आहेत. तर मालवण मधील गावठाण, आडवली, मार्गाचीतड, बगाडवाडी, वायंगवडे, आंगणेवाडी, मोगरणे, म्हावळुंगे, आमडोस, सय्यदजुवा, हिर्लेवाडी, नांदरूख, वरचीवाडी, डोंगरेवाडी, भगवंतगड, भटवाडी (चिंदर), पेंडुर, नागझर, तेरईवाडी, जामडूल, आनंदव्हाळ, न्हिवे, बांदीवडे खुर्द, गावठाणवाडी, राठीवडे, मालोंड, हडी तर कुडाळ तालुक्यातील मांडकादेवी, बांबुळी, घाडीगांव, कारीवणे, सोनवडे तर्फ कळसुली, कुटगांव, पिंगुळी, गोंधळपूर, कुसबे, हुमरस, बेनगांव, नेरूर क. नारूर, कविलकाटे, तळीगांव, आंदुर्ले, बेलाचीवाडी, गोळवण, पळसंब, कविलगांव ही गावे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. आरक्षण सोडती दरम्यान कुडाळ व मालवण तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.