पोलीस पाटील रिक्त पदाकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ

13 नोव्हेंबर रोजी पर्यंत करता येणार पोलीस पाटील पदासाठी अर्ज

कणकवली उपविभागातील कणकवली, वैभववाडी व देवगड या तालुक्यातील पोलीस पाटिल पदाच्या रिक्त पदावर भरती प्रक्रिया सुरू असून याकरिता अर्ज दाखल करणे याकरिता 9 नोव्हेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र या पदभरती प्रक्रिये करिता अर्ज स्वीकारण्यासाठी 9 नोव्हेंबर नंतर 13 नोव्हेंबर या दिवसाची एक दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. 10, 11, 12 हे तीन दिवस सुट्टी असल्यामुळे 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत संबंधित तहसीलदार कार्यालय येथे अर्ज स्वीकृतीचे कामकाज करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी काढलेल्या शुद्धिपत्रकात म्हटले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!