वर्दे ग्रामपंचायतीवर उबाठा सेनेचा झेंडा

सरपंचपदी उबाठा सेनेचे महादेव पालव
निलेश जोशी । कुडाळ : वर्दे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी ५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये उबाठा सेनेचे महादेव पालव यांना ३०८ मते मिळून ते विजयी झाले. तर भाजपचे विजय उर्फ गुंडू सावंत यांना २४६ मते मिळाली तसेच निलेश जाधव (९७ मते), दिलीप सावंत (७८ मते), धोंडी सावंत (२९ मते), आणि नोटा ६ मते मिळाली. प्रभाग १ मध्ये साक्षी पालव (१७८ मते विजय), भक्ति सावंत (१८८मते विजय), संगीता सावंत (१३७मते), संजीवनी सावंत (११४ मते), नोट ८ मते, प्रभाग २ मध्ये भिकाजी सावंत (१०१ मते विजय) हरिश्चंद्र गायतोंडे (७४ मते), सायली गावडे (९८ मते विजय), हर्षदा गायतोंडे (७७ मते), नोटा २ मते, प्रभाग ३ मध्ये प्रदीप सावंत (१२८ मते विजय) सचिन सावंत (७९ मते), भरत कदम (६१ मते), नोटा ४ मते, संपदा जाधव (१४९ मते विजय), काजल सावंत (१२१ मते), नोटा २ मते.
निलेश जोशी, कोकण नाऊ कुडाळ.