बांधकाम कामगारांना संघटित करणार – बाबल नांदोसकर 

कामगार संघटित करण्यासाठी जिल्हा दौऱ्याचे आयोजन

निलेश जोशी । कुडाळ : जिल्ह्यातील तळागाळातील बांधकाम कामगार संघटीत होऊन एका छत्राखाली येण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे जिल्हा अध्यक्ष बाबल नादोसकर यांनी खांबाळे ता वैभववाडी येथे केले.  संघाचा जिल्ह्यात सर्व तालुक्यात दमदार दौरा सुरू आहे. 
    सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाच्या वतीने जिल्ह्यातील तळागाळात असणारा बांधकाम कामगार हा संघटित झाला पाहिजे, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन शासन दरबारी मांडता यावेत, या उद्देशाने सिंधुदूर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाने जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हादौऱ्याचे आयोजन केले आहे. 
     कुडाळ तालुक्यात घावनळे येथे दौरा झाला. यावेळी रविंद्र साळकर  अनिल कदम, सदस्य विनायक मेस्त्री, महेश पालव, सौ सोनाली मुंज, बाबली जाधव, सुनील खोचरे, नागेश सावत, साई सावंत, निकिता तेली, सौ साक्षी सावंत, सौ गीतांजली तिळवे, सौ राजश्री बागवे, लक्ष्मण घाडीगावकर खांबाळे येथे  रामदास पवार, ज्ञानदेव साळुंखे, बबन पवार, दिनेश पालकर,  अशोक पवार, शिवाजी पवार, प्रकाश दळवी, रवींद्र सुतार, मारुती पवार तसेच बहुसंख्य कामगार उपस्थीत होते.
   यावेळी श्री नादोसकर म्हणाले, सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेले काही महिने कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने आपल्या सर्व बांधकाम कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  आपला हा बांधकाम कामगार अनेक क्षेत्रात  कार्यरत आहे, मात्र अनेक योजनापासून हा कामगार वंचित आहे.  आपल्याला न्याय्य मागण्यासाठी शासन दरबारी आवाज उठविण्यासाठी सर्वप्रथम संघटित होणे काळाची गरज आहे. यासाठीच आम्ही जिल्ह्यात तळागाळात बांधकाम कामगार संघटीत करण्यासाठी पावले टाकली आहेत. कोंकणात मागील महिन्यापासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. आता दिवाळीचा सण जवळ आला आहे.  वाढत्या महागाईमुळे आपला कामगार अनेक संकटाना सामोरे जात आहे. यासाठी आवाज उठविणे हे आपले पुढचे पाऊल असून त्यानुसार आपण वाटचाल करावी. आमचा बांधकाम कामगार कल्याणकारी संघ तुमच्यासोबत आहे. अशाच प्रकारे संघटना गावी जाऊन कामगाराना मार्गदर्शन करेल असे सांगत बांधकाम कामगार याना शासन योजना कामगार नोंदणी, नुतनीकरण मिळणारे लाभ यासंबंधी मार्गदर्शन केले. बांधकाम कामगार संघटीत होणे काळाची गरज आहे. शासनाच्या कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या तळागाळात पोचल्या पाहिजेत. त्यांचे प्रश्न शासन दरबारी सुटले पाहिजेत यासाठी आम्ही कार्यरत राहू असे सांगितले. 

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!