शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कणकवलीतील दुकानाचे नुकसान

अनेक नागरिकांची घटनास्थळी धाव
कणकवली शहरातील गोकुळधाम हॉटेल खाली असलेल्या श्री गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्टच्या दुकानाला शुक्रवारी दु. २.४५ वा. सुमारास आग लागली. यात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र तातडीने आग आटोक्यात आल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुरुकृपा ऑटो स्पेअरपार्ट हे
दुकान मालक संजीव शिरसाट हे बंद करून घरी गेले होते. दरम्यान दुकानातून धूर येत असल्याची कल्पना लगतच्या दुकान मालकाना दिली. दुकान मालक यांनी तातडीने धाव घेत लगेच शटर उघडले. यावेळी दुकानाचे काउंटर व पुढील भागाला लागलेली आग तातडीने अग्निरोधक यंत्राच्या माध्यमातून आटोक्यात आणण्यात आली. तसेच तातडीने नगरपंचायतचा बंब ही घटनास्थळी दाखल झाला होता. आग तातडीने आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
आगीबाबत माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, अनिल हळदिवे, आनंद पारकर, पंकज पेडणेकर, साहिल शंकरदास, तुषार मोरये,प्रतीक कडुलकर, यश मोडक, नगरपंचायतचे मनोज धुमाळे, गणेश लाड, विनोद जाधव, श्री ताम्हणकर, यांच्यासह महसूलचे मंडळ अधिकारी मेघनाथ पाटील, तलाठी सुवर्णा कडुलकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती.
कणकवली, प्रतिनिधी





