“गॅस एजन्सी”च्या माध्यमातून दिलेला शब्द योग्य निशाण्यावर लागेल!

आमदार नितेश राणे यांचा कणकवली कार्यक्रमात टोला

खरेदी-विक्री संचालित समता बाजारच्या दुकानाचे आमदार राणेंच्या उद्घाटन

कणकवली तालुका खरेदी विक्री संघ हा तालुक्यातील शेतकऱ्यांना आपलासा वाटणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सोयी सुविधा दिल्या जात असताना येत्या काळात खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पेट्रोल पंप व गॅस एजन्सी सुरू केली जाणार आहे. या खरेदी विक्री संघाचे उत्पन्न वाढण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सारखाच आम्ही एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतो. त्यामुळे गॅस एजन्सीचा शब्द निशाण्यावर लागेल याची मला व माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंना खात्री आहे. असा टोला आमदार नितेश राणे यांनी कुणाचे नाव न घेता लगावला. कणकवली खरेदी विक्री संघ संचालित समता बाजार क्रमांक 2 च्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, विठ्ठल देसाई, खरेदी-विक्री संघ संचालक संजय शिरसाट, सुरेश ढवळ, बबन हळदिवे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कविता राणे, सुशील पारकर आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!