राज्यातील कृषी सेवा केंद्र तीन दिवस राहणार बंद : शासनाच्या जाचक नियमांचा विरोध

कृषी कायदा विधेयकाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेते दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 4 नोव्हेंबर 2023 तीन दिवसाचा कडकडीत बंद पाळणार असून सदर नवीन विधेयके प्रस्तावित झाली आहेत त्यातील जाचक अटींना विरोध करण्यात येणार आहे.
स्नेहसंघ कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत पंकज दळी यांनी ही माहिती दिली
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कृषी निविष्ठा केंद्रांचा हा तीन दिवसीय कडकडीत बंद पाळण्यात येणार असून याबद्दल व्यापारी संघाचा तसेच कृषी पदवीधर संघाचा ही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले
यासंदर्भात बोलताना हेमंत सावंत आणि पंकज दळी यांनी सांगितले की
कृषी निविष्ठाविक्रेते हा शेतकऱ्यांचा मित्र असून शेतकऱ्यांच्या अडी अडचणी मध्ये सहाय्य तसेच मार्गदर्शन करत असतो .कृषी केंद्रामध्ये येणारा खते, बी बियाणे, कीटकनाशके याची तपासणी उत्पादक पातळीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते आणि नंतरच सीलबंद वेष्ठनातून कृषी सेवा केंद्र चालक विक्री करत असतात तरीसुद्धा प्रस्तावित विधेयक क्रमांक 40 41 42 43 आणि 44 यामध्ये जाचक अटींचा अंतर्भाव असून विक्रेत्यांना विक्री केलेल्या निविष्ठांमध्ये काही अनियमितता आढळून आल्यास त्यास विक्रेत्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.वास्तविक पाहता कृषी निविष्ठा सीलबंद असून त्या खरेदी करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी सेवा केंद्र करत असतात त्यामध्ये कृषी सेवा केंद्रांचा जबाबदार धरण्यात येऊ नये या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हा बंद पाळण्यात येणार आहे.”असे श्री सावंत आणि दळी यांनी म्हटले आहे
प्रस्ताविक विधेयकामध्ये विक्रेत्यांवर झोपडपट्टी गुंड वाळू माफिया यांना लावण्यात येणारी कलमे लावून शिक्षा देण्यात येणार आहे शासनाने अलीकडेच कृषी सेवा केंद्र चालकाला कृषी पदवीधर असल्याशिवाय परवाना मिळत नाही असे आदेश काढले आहेत मग जर अशा प्रकारची विधेयके आणून गुंड कायद्याअंतर्गत कृषी सेवा केंद्र चालकांना सजा देण्यात येणार असेल तर नवीन कृषी पदवीधर या व्यवसायामध्ये कसे पडतील. ?”असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे
सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी)