कुडाळ पं.स. चा ‘वाडवाळ’ महोत्सव उत्साहात 

पंचायत समितीचे ‘पालखीचे भोई’सन्मानित 

बीडीओ विजय चव्हाण त्यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य  

निलेश जोशी । कुडाळ : कुडाळच्या सर्वागीण विकासासाठी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी  घेतलेली गरुडझेप उल्लेखनीय आहे.  भविष्यात कुडाळला येणाऱ्या बिडीओना  हा काटेरी मुकुट कसा पेलवेल हा प्रश्न आहे.  बीडीओ विजय चव्हाण  यांची कामातली धडाडी पाहता उर्वरित वाटचाल त्यांनी राजकीय दिशेन करावी, असा सूर पंचायत समितीच्या  वाडवाळ महोत्सवात उमटला.  यावेळी कुडाळ पंचायत समितीच्या यशामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी, पत्रकार यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. 


   कुडाळ पंचायत समितीला राज्यस्तरावरील यशवंत पंचायत राज अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना अंतर्गत उल्लेखनीय कामांसाठी पुरस्कार प्राप्त आहेत. याशिवाय राज्यातील कुडाळ तालुका एकमेव असा तालुका आहे की ज्यातील सर्व १२२ महसुली गावे स्वच्छतेमधील ODF ++, MODEL एवढेच नाही तर संपूर्ण तालुका स्वच्छतेमधील FIVE STAR झालेला आहे.या सर्व यशात कुडाळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी , कर्मचारी , जनता आणि  लाभार्थी यांचे महत्वाचे योगदान आहे. या निमित्तान कुडाळ तालुका पंचायत समितीचे  सर्व विभाग आणि  प्रशासन यांच्या वतीन वाडवाळ महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विकासाच्या पालखीच्या भोईंचा प्रातिनिधीक सन्मान सोहळा आणि  गटविकास अधिकारी विजय  चव्हाण यांना सेवानिवृत्तीपर शुभेच्छा देण्याचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला  पद्मश्री परशुराम गंगावणे, आम वैभव नाईक, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, विशाल तनपुरे, सेवानिृवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, तहसीलदार अमोल पाठक, प्राची चव्हाण, माजी जि प अध्यक्ष काका कुडाळकर, डॉ. शरण चव्हाण, प्रतीक्षा चव्हाण, के टी चव्हाण, सुजित जाधव, पंढरी चव्हाण, श्याम चव्हाण, अतुल बंगे, राजन परब, मिलिंद नाईक, राजन जाधव, कावेरी चव्हाण, मोहन भोई, प्रफुल्ल वालावलकर, बाळकृष्ण परब,  मृणाल कार्लेकर, गणेश राठोड, रवी पवार, पूजा पिंगुळकर, डॉ प्रसाद देवधर, अमरसेन सावंत, बीडीओ व्हि एम नाईक, अरुण चव्हाण, नागेश आईर,  दादा बिर्जे, विष्णू खोबरेकर, प्रसाद पोईपकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भोसले, डॉ सई धुरी डॉ संदेश कांबळे, मनोहर आंबेकर, श्रीराम चव्हाण, अमरसेन सावंत, मालवण बिडिओ श्री गुर्जर, औदुंबर मर्गज, डॉ गणेश मर्गज, ग्रामसेवक, शिक्षण विभाग, सरपंच संघटना, पदाधिकारी, पंचायत समिती कुडाळ सर्व विभाग, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा ,जिल्ह्यातील चर्मकार समाज पदाधिकारी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
प्रशासनमध्ये कार्यतत्परता असणारा अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची ओळख असल्याचं सांगून आमदार वैभव नाईक यांनी बीडीओ विजय चव्हाण याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  बीडीओ विजय चव्हाण यांनी  जिल्हा परिषद पुरते न राहता यापुढेही जाव अस सांगून सीईओ प्रजीत नायर यांनी आम्ही त्यांचा उपयोग शासनाच्या विविध योजनांसाठी करू असे सांगितल. गटविकास अधिकारी पदावरून जरी मी सेवानिवृत्त झालो तरी आयुष्यातील अनेक प्रवासातून नाही हा माझा प्रवास सुरूच राहणार आहे अस विजय चव्हाण यांनी सांगितल.  अधिकारी पदावर नसलो तरी तुमच्या सोबत मी सदैव राहीन असं ते म्हणाले. 
यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे, तहसीलदार अमोल पाठक, काका कुडाळकर, के टी चव्हाण, डॉ मर्गज, श्री गुर्जर, सुजित जाधव, मिलिंद नाईक, बबन परब, श्री भोसले यांनी मनोगत व्यक्त केल.  बीडीओ विजय चव्हाण यांच्या सेवानिवृत्ती निमित्त यांच्यावर प्रेम करणारे विविध स्तरातले शेकडो लोक यावेळी उपस्थित होते. त्यांनी विजय चव्हाण याना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रफुल्ल वालावलकर यांनी केलं.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!